Thursday, August 30, 2018

My Poem on Rainpada Lynching

घटना 1 जुलै 2018 ला
राईनपाडा धुळे, जिल्ह्याला
पाच लोकांची आहुती धर्माला
नाथधर्म जागवाला
साद बातमीला
जाग समाजाला
मोडलेल्या घडीला
घेराव पडे जिल्ह्याला
प्रेत सोडली माणदेशाला
पोलीस संरक्षण प्रेताला
हो प्रेताला
जितपणी नाय जीवाला
प्रेत रवाना खवे गावाला
जमला मायेचा पसारा
राजकारणी भेटीला
सरकार दम दाटीला 
सगेसोयरे समाज त्या समयाला
त्या समयाला
कुटुंबाच्या आधाराला 
आधार त्या समयाला
दिला हो दिला
हाक शासन माय बापाला
पोटच्या लेकराला
आईने दिली हो दिली
आक्रोश दाहिदिशाला
तोंडचा घास हो नेला
हो नेला
यातना जीवाला
जागा नाय कोण झाला
हो झाला

आदेश कलेक्टरला
कणव नाही सरकार मायबापाला
ताळमेळ नाही जमातीला
राजकारणी नेत्याला
बोळवण कागदाच्या तुकड्याला
समाज विचारे व्यवस्थाला
प्रश्न नाय पाच लोकांचा
जीव भयभीत झाला हो झाला
या घटनेला, या घटनेला
कशी लावू झोळी काखेला,
पोटासाठी भिक्षेला, जाऊ भिक्षेला
वचन नाथाच्या दीक्षेला
शैली शिंगी रुद्राक्ष माला
कानी मुद्रा, गुलाल कपळाला
डवर,त्रिशूल हाताला
अलख जग जागला   
मरण नेमलं वाटलां
समाजाचा हत्याकांड झाला हो झाला

असा गुन्हा काय केला
पोटासाठी भिक्षा मागाला
जागा नाही स्मशानाला
अग्नी दिली माळ रानाला

मोर्च्या निघे नागपूरला
वेढा आणला महाराष्ट्राला
तालुका, जिल्ह्याला
आता खपवून घेणार
आक्रमण मागत्या धर्माला

थू त्या सोशल मीडियाला 
 खेळ मरणाचा मांडला
भडकवी जन माथ्याला
धोका निष्पाप जीवाला
मजा दुनियेला, शॉकींनाला
 डिजिटल भारत झाला हो झाला

संशयाचं थैमान देशाला
अफवाच भूत उशाला
सरकार नुसतं आश्वासनाला
कित्येकांचा जीव असाच गेला
चोर सोडून फाशी संन्याशाला
सजा न केलेल्या गुह्याला 
जमात लागली अरणीला
अश्रू आलं धरणीला

नाय दाद सरणाला
स्वतःच्या मरणाला
चाललो स्वतःच सरणं रचाला
जगतो घेऊन मरण उशाला

भटकंती पुजली पाचवीला
पोलीस पाठराखणीला
अख्खा जन्म यात गेला
वाली नाही कुणी झाला
जन्म येऊन वाया गेला
किती राजकारणी आला नी गेला
सत्ता पैसा घेऊन झोपे उशियाला
अन्न नाही पोटाला
सारा जग पिंजून हो आला
नाही ठिकाणा हो मिळाला 
 पशुपक्षी सम जीव झाला

संरक्षण प्राणी पक्षाला
नाही आमच्या जीवाला
गुलाम करी माणसाला
किंमत नाय जीवाला
कवडी मोल भटक्याला

७१ वर्ष शोधे निवाऱ्याला
जगे लोकांच्या आसऱ्याला
जीवाचा भरोसा धरणीमातेला

मागणी देशाला,
उपाशी पोटी संरक्षणाला
काम दे हाताला
सन्मान हवा संविधानाला
आमच्या जगण्याला
बास करा आयोगाला
न्याय द्या जन्माच्या भोगाला
आता कलंक नको कपाळाला
मुक्ती द्या भिक्षापात्राला
सांगतो आता जमातीला
जोग्याला
जागा हो या समयाला
नाहीतर हकनाक गेला 
काळ येऊन ठेपला
जागो हो हाकेला
भिक्षापात्र संकटाला
 प्रेरणा घे बाबाला,
शिका,संघटित व्हा,संघर्षाला
स्वप्न राजकर्ती जमातीला   
आपलं हक्क मिळवाला

                                                        डॉ.कालिदास  शिंदे  

2 comments:

Sachin Shinde said...
This comment has been removed by the author.
Sachin Shinde said...

शिक्षणातून सर्वांगीण प्रगती कडे वाटचाल समाजाची गरज आहे . समाजाला शैक्षणिक क्रांती मार्ग दाखविणारे मार्गदर्शक , नेतृत्व कमी आहेतच त्यासाठी नव युगातील सुक्षीशीत पिढीने समोर यावे आणि आपापल्यापारी योगदान द्यावे.
कालिदास सर तुमचे संशोधन कार्य खरच स्तुत्य आहे. तुमचे कार्य नक्कीच समाज विकासामध्ये मैलाच्या दगडाचे कार्य करेल.
सचिन बबन शिंदे